सोलापूर – महसूल सहाय्यक व सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गाला मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नायब तहसीलदार पदावर संधी देण्यात यावी, या मागणीसाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले .
महसूल विभाग हा शासनाचा जनतेशी थेट संबंध असलेला विभाग असून महसूल सहाय्यक अत्यंत जबाबदारीने महसूल वसुली, जमीन विषयक कामकाज, न्यायालयीन व अर्धन्यायिक कामकाज आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करत आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, महसूल सहाय्यक / सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गाला नायब तहसीलदार पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची संधी देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी त्यानुसार नायब तहसीलदार पदाचे प्रमाण ७०:१०:२० (पदोन्नती / विभागीय स्पर्धा परीक्षा / नामनिर्देशन) असे ठरविण्यात आले आहे.
मात्र ही मागणी गेल्या १० वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. अद्याप शासन निर्णय निघाला नसल्याने या संवर्गाची मोठी हानी होत आहे. गृह विभाग, महिला व बालविकास विभाग यांसारख्या इतर विभागांमध्ये कर्मचाऱ्यांना विभागीय स्पर्धा परीक्षेची संधी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महसूल विभागाला न्याय द्यावा.
यशदा समितीची शिफारस, महसूल विभागाची मान्यता आणि मुख्यमंत्र्यांची मान्यता असतानाही निर्णय होत नसल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून या प्रस्तावाला तात्काळ मान्यता देण्याची मागणी केली आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















