मोडनिंब – येथील प्रभाग क्रमांक ३ मधील सार्वजनिक बोअरच्या पाणीपुरवठा यंत्रणेची केबल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. पाणीपुरवठा केबल चोरीला गेल्याने पाणीपुरवठ्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.
सार्वजनिक बोअरवरून होणारा पाणीपुरवठा सुरू करण्याच्या कामावर परिणाम झाला आहे. या घटनेची तातडीने चौकशी करून चोरीला गेलेल्या केबलचा शोध घ्यावा, तसेच संबंधित दोषीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.पाणीपुरवठा यंत्रणा सुरू करण्याच्या टप्प्यावरच केबल चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक पाणीपुरवठ्याशी संबंधित साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. ग्रामपंचायतीने या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांत तक्रार दाखल करावी, अशी मागणी होत आहे.
केबल चोरीला गेल्याने पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय आला. या घटनेची तातडीने चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा. केबलची व्यवस्था करून नागरिकांसाठी लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.
बालाजी पाटील
ग्रामपंचायत सदस्य