सोलापूर – बिग बॉस मराठी सीझन 6, ची विजेती तन्वी कोलते यानी श्री मशरूम गणपतीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या हस्ते श्री ची आरती व पूजा करण्यात आली. या वेळी त्यानी कोणते ही काम असो मी श्री गणेशाचे तसेच श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेउनच कामकाज करत आहे. मला श्री ची आरती व पूजा करण्यास मिळाली हे माझे भाग्यच समझते. मंदिर परिसरातील पहाणी करून माहिती घेतली व मंदिरात येणाऱ्या गणेश भक्ताच्या सोयी सुविधा स्वच्छता नियमावली पाहूण समाधान व्यक्त केले.
यावेळी भावीकाणी त्याना पहाण्यासाठी व फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांच्या हस्ते त्यांची ”श्री ” ची प्रतिमा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मशरूम गणपति भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी, भैया पतंगे, ईश्वर पतंगे, कुमार सुरवसे, दिपक देशमुख, साजन साबळे, हीरा बावरी, सलमान कडपे, आयुष्य कांबळे, कुणाल कसबे, समर्थ बमगुंडे, गणेश हौशेट्टी, नागराज हौशेट्टी आदी उपस्थित होते.





















