सोलापूर : स्वकुळसाळी समाज ज्ञातीच्या वतीने आयोजित भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव, नामसप्ताह, पालखी व भव्य रथ मिरवणुकीसह विविध उपक्रमांचा वार्षिक अहवाल (२०२५-२६) याचे प्रकाशन महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते विणकर बाग येथे करण्यात आले.
यावेळी महापौर कोंड्याल यांनी वार्षिक अहवालाचे कौतुक केले. समाजाच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्यासोबतच युवक व महिला मंडळांचा सहभाग आणि सामाजिक एकात्मतेसाठी सुरू असलेले उपक्रम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्मरणिका समाजाचा इतिहास, परंपरा आणि सेवाभावी कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक शशिकांत कैची तसेच स्वकुळसाळी समाज ज्ञातीचे विठ्ठल मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.ट्रस्टचे अध्यक्ष परमेश्वर गदगे, उपाध्यक्ष प्रवीण कापसे, सचिव ॲड. ज्ञानेश्वर डिंगणे, सहसचिव आनंद कंगे, खजिनदार अंबादास सरवदे, विश्वस्त जयहरी साखरे, ज्ञानेश्वर एडके, अमरनाथ सपार, यशवंत एकबोटे, सौ. नलिनी शेंद्रे आणि रत्नप्रभा वि. चिल्लाळ यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
—
Post Views: 4