सोलापूर – अज्ञात करण्यावरून एका 49 वर्षीय इसमाने घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगल ला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नीलम नगर भागात जमादार वस्ती येथे आज शुक्रवारी दुपारी तीन वाजता उघडकीस आली.
शरणाप्पा शिवप्पा संपले (वय 49 वर्षे, राहणार जमादार वस्ती, नीलम नगर, एमआयडीसी सोलापूर, मूळ राहणार बेडर गल्ली ,अक्कलकोट) असे त्या मयत व्यक्तीचे नाव आहे.
आज शुक्रवारी दुपारी शरणप्पा यांनी घरामध्ये गळफास घेतला असल्याचे घरच्यांना आढळून आले. ही खबर एमआयडीसी पोलिसांना समजली असता पोलीस हवालदार ए एन शेख यांनी घटनास्थळी पोहोचून नातेवाईकांच्या साह्याने सदरचा मृतदेह खाली उतरून येथील शासकीय रुग्णालयात चार वाजता दाखल केल असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Post Views: 3