राहत्या घरामध्ये कुंटणखाणा चालवणाऱ्या एका महिलेस बोगस गिऱ्हाईकास पाठवून खात्री केली अन् सापळा लावून या प्रकाराचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पर्दाफाश केला. पिडितेची सुटका करण्यात आली. निलम श्रमजीवीनगर येथे ही कारवाई करण्यात आली. कुंटणखाणा चालवणाऱ्या महिलेस अटक करुन न्यायालयापुढे उभे केले असता तिला पोलीस कोठडी मिळाली आहे. शहरामध्ये छुप्या पद्धतीने कुंटणखाना सुरु असल्याची खबर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाला खबऱ्यांकडून समजली. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी खबऱ्याच्या माहितीनुसार ८ फेब्रुवारी रोजी निलम श्रमजीवी नगरातील मार्कंडेय चौकात जाऊन संबंधीत घरात बोगस गिऱ्हाईक पाठवून खातरजमा केली. शहानिशा केल्यानंतर सापळा लावून गंगुबाई आण्णप्पा रोकडे (वय- ५०) या महिलेला अटक केली. या सापळ्यात आढळलेल्या पिडित महिलेची सुटका करण्यात आली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















