मोडनिंब – सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता.माढा) येथील ग्रामदैवत श्री वेताळ साहेब देवस्थानला डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य राजा माने यांनी भेट दिली व दर्शन घेतले.
याप्रसंगी मोडनिंबकर ग्रामस्थ व श्री वेताळ देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. आजोळ मोडनिंबचे ग्रामदैवत वेताळ बाबांचे दर्शन घेऊन डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या ४ मे रोजी पणजी येथे गोवा कला अकादमीच्या शानदार सभागृहात होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनासाठी रवाना होणार असल्याचे माने यांनी सांगितले.
याप्रसंगी वेताळ देवस्थान ट्रस्टचे संभाजी लादे, सचिव विजय खेलबुडे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे ॲड. विजयसिंह गिड्डे, पत्रकार प्रथमेश पवार, यशवंत पवार, जयंत पवार, पुजारी गुरव,अमेय पवार, श्रेयस फाळके, सिद्धांत गांधी, शुभम काळे आदी उपस्थित होते.



























