अक्कलकोट – खंडप्पा गंगाधर घोडके यांची मुंबई पोलिस खात्यात, अन्दप्पा भरमशेट्टी यांची मीरा भाईंदर पोलीस खात्यात तर चंद्रकांत रोट्टे यांची पुणे शहर पोलिस खात्यात विविध पदांवर नोकरी लाभल्या प्रित्यर्थ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी खंडप्पा घोडके, अन्दप्पा भरमशेट्टी, चंद्रकांत रोट्टे यांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र देवून सन्मान केला. यावेळी बोलताना चेअरमन महेश इंगळे यांनी मनातील जिद्द व चिकाटीला आपले लक्ष बनवून परस्थितीशी संघर्ष करत खंडप्पा घोडके, अन्दप्पा भरमशेट्टी, चंद्रकांत रोट्टे
यांनी मिळवलेल्या यशाबद्दल महेश मालक इंगळे यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रथमेश मालक इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, वैभव जाधव,
शिवशरण अचलेर सर, श्रीशैल गवंडी,
सचिन बंदिछोडे, ज्ञानेश्वर मोरे, सूर्यकांत रोटटे, नागेश घोडके, रमेश शिंदे सर, अमर पाटील, श्रीकांत मलवे, खाजप्पा झंपले, सुनिल पवार व अन्य उपस्थित होते.
फोटो ओळ – श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात खंडप्पा घोडके, अन्दप्पा भरमशेट्टी, चंद्रकांत रोट्टे यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

























