सोलापूर – पारंपरिक लोककलेतील मृदंगवादनाची साधना करत असलेल्या राजवीर जांभळे याने आपल्या उत्कृष्ट वादनातून जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले. बालरंगभूमी परिषद, सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित ‘जल्लोष लोककलेचा २०२६’ या एकल व समूह वादन जिल्हास्तरीय स्पर्धेत त्याने एकल वादन प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
राजवीरने मृदंगावर चौताल प्रकाराचे प्रभावी आणि तालबद्ध सादरीकरण केले. त्याच्या वादनातील लयबद्धता, तालाची जाण आणि सादरीकरणातील आत्मविश्वास यामुळे परीक्षकांचे लक्ष वेधले. दमानी प्रशालेच्या वतीने त्याने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.वयाच्या सहाव्या वर्षापासून राजवीर जांभळे पखवाजाचे धडे गिरवत आहे.
राजवीर हा श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असून, प्रशिक्षक ज्योतीराम चांगभले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तो मृदंगवादनाचे प्रशिक्षण घेत आहे. नियमित सराव आणि पारंपरिक कलेप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.
( टीप मेल वरील फोटो लावणे वर्गणीदार बातमी)
स्पर्धेतील यशाबद्दल राजवीरला संस्थेच्या वतीने सन्मानपत्र, रोख बक्षीस आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. त्याच्या या यशामुळे पालक, शिक्षक, प्रशिक्षक तसेच कला क्षेत्रातून कौतुक होत आहे.
पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत लोककलेचा वारसा पोहोचविण्याची गरज असताना, राजवीरसारख्या विद्यार्थ्यांचे यश या कलेला प्रोत्साहन देणारे ठरत आहे.
Post Views: 6