सोलापूर – पार्क स्टेडियम जिमखाना हॉल येथे झालेल्या शालेय शहर बुद्धिबळ स्पर्धेत इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल च्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात मास्टर स्वानंद प्रदीप तपकिरे याने तृतीय क्रमांक संपादिला. या कामगिरीवर त्याची पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली . त्यास क्रीडाशिक्षक अजय चाबुकस्वार यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे संस्थापक अध्यक्ष ए. डी. जोशी, सचिव अमोल जोशी, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिव सायली जोशी, मुख्याध्यापिका मानसी जोशी तसेच ममता बसवंती यांनी अभिनंदन करून पुणे विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















