बार्शी – येथील महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीचा विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या नव्या वाटा खुल्या व्हाव्यात, या उद्देशाने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. डॉ. अब्दुल कलाम यांचे जीवन, त्यांचे वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान, शिक्षणाविषयीची तळमळ आणि विद्यार्थ्यांना दिलेली प्रेरणा यांची आठवण या निमित्ताने करण्यात आली.
वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते, भाषासमृद्धी वाढते आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांसोबतच विविध चरित्रग्रंथ, कथा, कादंबऱ्या, विज्ञानविषयक पुस्तके व प्रेरणादायी साहित्याचे नियमित वाचन करावे, असा संदेश या दिनाच्या निमित्ताने देण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका श्रीमती एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने, ग्रंथपाल श्री मनोज मिरगणे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 6