नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीवर माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता आणि वीरपित्यांनी सलामी देत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आणि माजी सैनिक संघटना, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सलामी देण्यात आली. त्यानंतर महार रेजिमेंटचे ‘महार गान’ सादर करण्यात आले. उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानिक मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. यावेळी विविध रेजिमेंटमधील वीर सैनिक, वीरनारी आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष सुभेदार प्रदीप गायकवाड, राज्य उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे, राज्य विधी सल्लागार राजेंद्र खोब्रागडे, राज्य कोषाध्यक्ष श्यामराव भोसले, राज्य प्रवक्ते आयुष्यमान गजानन इंगळे, युद्धवीर लिंबाजी कांबळे, सोलापूर जिल्हा संघटक सूर्यकांत गजघाटे, पुणे जिल्हाध्यक्ष सुभेदार संतोष वानखडे आणि पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपट आल्हाट यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॅप्टन दत्ता गवई, सुभेदार सतिंदर चावरे, सुभेदार मनोज चव्हाण, नायब सुभेदार पंजाब पाटील, सुभेदार मेजर राजकुमार मेश्राम, शरद चोरपगार यांनी परिश्रम घेतले.
——–
Post Views: 6