सोलापूर – सन्मती ज्ञानप्रसारक मंडळ सोलापूर व प्रज्ञाश्रमण दिगंबर जैन जनकल्याण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 श्री देवनंदजी महाराजांच्या जन्मजयंती निमित्त श्री.न.फू.शहा कोठारी हायस्कूल येथे पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस उद्घघाटक म्हणून वालचंद कॉलेजचे प्राचार्य श्री संतोष कोटी सर , अध्यक्ष म्हणून संस्थेचे विश्वस्त श्री.बाहुबली उपाध्ये, उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते धर्मध्वजपूजन व धर्मध्वजारोहण करून सारस्वताचार्य श्री.देवनंदिजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादरीकरण केले. स्पर्धेनंतर लगेच बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका सौ.वैशाली गांधी, प्रसिद्ध व्यापारी श्री.वीरकुमार गांधी उपस्थीत होते. तसेच मुख्याध्यापक श्री रमेश यादवाड ,मुख्याध्यापिका अनिता हाडोळे,मुख्याध्यापिका दर्शना उपाध्ये उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या सर्व स्पर्धकांचे रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. एकूण सात गटात स्पर्धा संपन्न झाले. प्रत्येक गटातून अनुक्रमे कु. श्रुती कारंडे, समृद्धी कोळी, श्वेताली कांबळे, आर्या आणेकर, प्रशाली सावळे, भाग्यश्री स्वामी, सृष्टी सगरे या या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. यावेळी बोलताना श्री संतोष कोटी सर यांनी पालक,विद्यार्थी संस्थेचे कौतुक केले. सौ.वैशाली गांधी यांनी यशस्वी स्पर्धक विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने स्पर्धक विद्यार्थी,पालक व चारही शाखेचे शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 5