सर्वांनी बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावे लागेल. विशेषता शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अद्यावत राहावे लागेल. नवनवीन तंत्रज्ञान, त्यातील विकसित झालेले सॉफ्टवेअर याचा वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन कार्यशाळेचे उदघाटक प्रा. डॉ. आर. एस. मेंते यांनी केले. ते वसुंधरा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या बी.ए. भाग तीनच्या भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळेत बोलत होते. ही कार्यशाळा वसुंधरा महाविद्यालय,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि सोलापूर भूगोल शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी डॉ. के.एम. जमादार, डॉ. एस. सी. आडवीतोट, डॉ. दीपक देडे, डॉ. बी.बी. राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय आढाव्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर झोंबाडे यांनी ही कार्यशाळा विद्यार्थी, शिक्षक, संशोधक यांच्यासाठी असून शिक्षकांनी कायमस्वरूपी अपडेट राहून विषयात तज्ञ झाले पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे अशी ठाम भूमिका मांडली. कार्यशाळेच्या प्रास्ताविकात डॉ. बी.बी. राऊत यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला . पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रदीप कोल्हे, आभार प्रा. डॉ. राजाराम पाटील, सूत्रसंचालन डॉ. संगीता भोसले यांनी केले.
———-
*सदर कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी अशा 107 जणांनी सहभाग नोंदवला*
————-
*कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. व्ही. के. पुकाळे, डॉ. चंद्रशेखर ताटे- देशमुख तर सत्राध्यक्ष प्रा. डॉ. आर.जे. मोहरकर, दुसऱ्या सत्रात तज्ञ मार्गदर्शक डॉ. एस. एस. मस्के, डॉ. डी. के. देडे, तर सत्राध्यक्ष डॉ. एम.जी. लवटे, तिसऱ्या सत्रात तज्ञ मार्गदर्शक प्रा. पांडुरंग जाधव, डॉ. कोनाडे भैरप्पा, तर सत्राध्यक्ष डॉ. नागनाथ धायगुडे इत्यादींनी जबाबदारी पार पडली*
























