सो. दि. १०/८/२८ :- महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा.ना.श्री. आकाश फुंडकर यांनी कामगारांना १ हजार विडीला ३६१ रुपये मजुरी देण्याचे आदेश जाहीर केले आहे. त्यानुसार सोलापुरातील सर्व विडी कामगारांना ३६१ रुपये मजुरी देण्यात यावे अशा मागणीच्या निवेदन विडी कामगार किमान वेतन हक्क व कृती समितीच्या वतीने विडी उद्योग संघ सोलापूर यांना गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले*
*सोलापूर विडी उद्योग संघाला देण्यात आलेल्या निवेदनात ३ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा.ना.श्री. आकाश फुंडकर साहेब यांनी सोलापूर शहरातील विडी कामगारांना दर हजार विडी मागे ३६१ रुपये मजुरी वाढ करून सर्व कारखानदारांना देणे बंधनकारक आहे. असे परिपत्रक काढले आहे. तरी विडी उद्योग संघाला किमान वेतन हक्क समितीच्या वतीने निवेदनाद्वारे कळविण्यात येत आहे की सोलापुरातील सर्व विडी कारखान्यातील कामगारांना मंत्री महोदयांनी जाहीर केल्याप्रमाणे मजुरी त्वरित देण्याच्या सूचना करावे असे नमूद करण्यात आले*.
*गोवर्धन सुंचू यांच्या निवेदन देणा-या शिष्टमंडळात विष्णू कारमपुरी (महाराज) सायबण्णा तेगेळ्ळी , राहुल गुजर , यांचा समावेश होता.*
Post Views: 13