Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माढ्यात पाण्यासाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित

तरुण भारतbyतरुण भारत
August 12, 2026
in west maharashtra
0
माढ्यात पाण्यासाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
माढा : सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी माढ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांनी माढा तहसील ऑफिस समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. पाटबंधारे विभाग सोलापूरचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी  आंदोलकांना १७ ऑगस्टला पाणी  सोडण्याचे लेखी आश्वासन दिले असल्याने ते आंदोलन २० ऑगस्ट पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे.
कानडे यांनी ३० जुलै रोजी भीमा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन मनकर्णा ओढ्यांमध्ये सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यास चिंचोली, सापटणे (भोसे), शिंदेवाडी, जाधववाडी (मा.), महातपूर, दारफळ, उंदरगाव, रोपळे (खुर्द),उपळाई (बु), विठ्ठलवाडी, लोंढेवाडी,आदी गावांना याचा फायदा होईल माढा शहराच्या पिण्याच्या पाण्याला काहीअंशी  मदत होणार असल्याने   शिंदेवाडी, वेताळवाडी रणदिवेवाडी अंबुरे तलाव आणि माढा परिसरातील विविध तलाव तातडीने भरावेत,अशीही मागणी केली होती. परंतु पाटबंधारे विभागाकडून १० ऑगस्टपर्यंत पाणी न सोडल्याने कानडे यांनी तहसील कार्यालय समोर सोमवारी अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. त्या आंदोलनाला  टेंभुर्णीचे उपविभागीय अभियंता मंजुनाथ तुंबळ यांनी भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली.परंतु आंदोलकांनी  उपोषण सोडण्यास नकार देत सोलापूरचे कार्यकारी अभियंता यांना या स्थळी बोलून लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. त्यानुसार कार्यकारी अभियंता सचिन पवार व तहसीलदार संजय भोसले यांनी त्या ठिकाणी येऊन १७ ऑगस्ट रोजी मागणीनुसार पाणी सोडण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आनंदराव कानडे यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे घोषित केले.
या आंदोलनाला माढ्यातील आरपीआय गट, वेताळवाडी ग्रामपंचायत, जाधववाडी ग्रामपंचायत,माढा मुस्लिम संघटना, डॉक्टर असोसिएशन,माढा शहर मनसे आदी संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी गुरुराज कानडे , शंभू साठे, शरद भांगे,आबा साठे, तानाजी जाधव, सुधीर सुरवसे, अनिल लोंढे, सोमनाथ राऊत,अनिल शिंदे, दत्तात्रय अंबुरे,अक्षय खारे यांसह संघर्ष समितीचे सदस्य माढ्यासह परिसरातील गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट…..
निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजाला अनेक वेळा संकटाचा सामना करावा लागतो यावर्षी माढा  व परिसरात पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अनेक गावच्या लोकांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत. पुणे व परिसरात पडलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण क्षमतेने भरले असल्याने सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील गावाना पाणी सोडण्यासाठी मी मागणी केली होती. त्या मागणीला पाटबंधारे प्रशासनाने १७ ऑगस्टला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनावर मी विश्वास ठेवून हे अन्नत्याग आंदोलन २० ऑगस्ट पर्यंत तात्पुरते स्थगित करत आहे. पाटबंधारे विभागाने त्यांचा शब्द न पाळल्यास पुढील काळात आम्ही शेतकरी पाण्यासाठी तीव्र आंदोलन करणार आहोत. तसेच मनकर्णा ओढा उपळाई व बेंद ओढ्याला कॅनॉलचा दर्जा देण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवण्यास अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवली आहे.
     आनंदराव कानडे
माजी जिल्हा परिषद सदस्य  (आंदोलक)
Post Views: 42
Previous Post

३६१ रुपये मजुरी देण्याबाबत हक्क समितीचे मालक संघाला निवेदन

Next Post

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत करमाळ्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत करमाळ्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत करमाळ्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

ताज्या बातम्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी केली मार्गांची पाहणी #solapurnews #news

September 5, 2026

श्रावण शुक्रवार निमित्त विठ्ठल रुक्मिणीस सुवर्ण अलंकारांनी नटविले #viral #marathinews #news

September 5, 2026

वालचंद कॉलेज समोरचे अतिक्रमण हटवले

September 5, 2026

शहर मध्यचा पूर्ण विकास करेन – आमदार कोठे #solapurnews #viral

September 5, 2026
ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

September 4, 2026
ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

September 4, 2026
श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

September 4, 2026

सोलापूरसह राज्यभरात एकांकिका स्पर्धेचे बिगुल

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1165308

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!