अक्कलकोट: भूक ही धर्म, जात, पंथ पाहत नाही… आणि माणुसकीलाही कोणत्याही सीमांचे बंधन नसते.
या विचाराला साजेसा उपक्रम राबवत रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त अक्कलकोट शहरातील मंगरूळ पेट्रोल पंपामागील झोपडपट्टी तसेच स्टेशन रोड डी.एड. कॉलेज पाठीमागील झोपडपट्टी परिसरातील गरीब, गरजू व निराधार लहान मुलांना बिस्किटांचे वाटप करून वर्धापन दिन अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.
मैत्री दिनाच्या पावन औचित्याने, दि. ५ ऑगस्ट २०१७ रोजी #सोलापूर रॉबिन हूड आर्मी टीमचे #हिंदुराव_गोरे व #अनिकेत_चनशेट्टी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटची स्थापना करण्यात आली.
अक्कलकोट शहरातील हॉटेल, बेकरी, मंगल कार्यालये तसेच घरगुती कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहणारे सुस्थितीत असलेले अन्न संकलित करून ते गरजू, भुकेल्या आणि बेघर नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू झाले आणि आजही ते अखंडपणे सुरू आहे.
मागील ९ वर्षांत रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटने साडेतीन ते चार लाखांहून अधिक गरजू नागरिकांना एक वेळचे अन्न उपलब्ध करून देण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. आजही शहरातील दररोज २५ ते ३० बेघर, गरीब व गरजू नागरिकांना नियमितपणे जेवण आणि फळांचे वाटप करण्यात येते.
याशिवाय, एस.टी. स्टँडच्या मागील झोपडपट्टीतील एका अत्यंत गरजू कुटुंबातील तीन मतिमंद व दिव्यांग मुलांना रॉबिन हूड आर्मी गेल्या अनेक वर्षांपासून दररोज दुपारचे किंवा रात्रीचे एक वेळचे जेवण न चुकता उपलब्ध करून देत आहे. ही सेवा आजही अखंड सुरू आहे.
केवळ अन्नदानच नव्हे, तर बेवारस मनोरुग्ण, निराधार व भिक्षेकरी व्यक्तींना वैद्यकीय उपचार मिळवून देणे, त्यांचे पुनर्वसन करणे, हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुरक्षित पोहोचविणे, तसेच उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्याचे मानवतावादी कार्य देखील रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटच्या सदस्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
या समाजसेवेत रशीद खिस्तके, सोहेल फरास, समीर शेख, अशरफ गोलंदाज, सैपन शेख, ज्योतिबा पारखे यांच्यासह सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
या सेवाकार्यात डॉ. विपुल शहा, डॉ. प्रमोद मजगे, डॉ. अशोक राठोड, डॉ.सतीश बिराजदार यांचे अमूल्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
तसेच पोलीस प्रशासन, पत्रकार बंधू आणि असंख्य दानशूर नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळे हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवणे शक्य झाले आहे.
आज रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बिस्किट वाटप कार्यक्रमात रशीद खिस्तके,सोहेल फरास,अशरफ गोलंदाज, अली मुजावर, समर्थ गोरे, मुआज शेख, मुवाज शेख, रेहान शेख तसेच इतर स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सोलापूर रॉबिन हूड आर्मी टीमचे हिंदुराव गोरे व अनिकेत चनशेट्टी यांचे लाभलेले मार्गदर्शन, सर्व स्वयंसेवकांची निःस्वार्थ सेवा, डॉक्टर, पोलीस प्रशासन, पत्रकार बंधू आणि दानशूर नागरिकांचे सातत्यपूर्ण सहकार्य यामुळेच रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटचा सेवेचा प्रवास आज नऊ वर्षे यशस्वीपणे पूर्ण करू शकला आहे.
#सेवा_हीच_खरी_पूजा_आणि_माणुसकी_हाच_खरा_धर्म” या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन रॉबिन हूड आर्मी अक्कलकोट पुढील काळातही “कोणीही उपाशी झोपू नये” या संकल्पनेतून गरजूंना आधार देण्याचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सक्रिय सदस्य: टिपू गोलंदाज,बाबा शेख, समर्थ गोरे,मुवाज शेख,आशिष हुबे,आकाश शिंदे,देविदास गवंडी,सागर पवार,योगेश महेंद्रकर,मुस्तकीम खिस्तके,जुनेद गोलंदाज, ज्योतिबा पारखे, सैपन शेख, रशीद खिस्तके,सोहेल फरास आदी. उपस्थित होते
Post Views: 5