मोडनिंब – सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या वितरिका क्रमांक ८ मध्ये टेल टू हेड पद्धतीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे, संचालक मोहन मोरे व शेतकरी बांधवानी निवेदनाद्वारे केली.शेतकऱ्यांनी यापूर्वी पाणी सोडूनही बैरागवाडी व जाधववाडी परिसरातील शेतकऱ्यांना पाणी पोहोचले नसल्याची व्यथा मांडली. त्यामुळे पिकांना पाणी मिळावे म्हणून टेल टू हेड पद्धतीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून त्वरित पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या असल्याचे संचालक मोहन मोरे यांनी सांगितले. त्यामुळे वितरिका क्रमांक ८ वरील बैरागवाडी, जाधववाडीसह परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























