सोलापूर : एस. ई. एस. तंत्रनिकेतनचा उन्हाळी परीक्षेत दैदिप्यमान निकाल तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला असून ३८६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण तर १४ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी-२०२६ डिप्लोमा परीक्षेत येथील एस. ई. एस. तंत्रनिकेतनच्या
विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे यंदा महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या सर्वच विद्याशाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
यंदाच्या अंतिम निकालात महाविद्यालयाच्या एकूण ३८६ विद्यार्थ्यांनी ‘विशेष प्राविण्यासह’ अव्वल श्रेणी प्राप्त केली आहे. तर ३१३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय महाविद्यालयातील तब्बल १४ हुशार विद्यार्थ्यांनी विविध कठीण विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून ‘टॉपर’ येण्याचा बहुमान मिळवला.
गुणवंतांची विभागनिहाय ‘टॉपर’ यादी:
संगणक अभियांत्रिकी विभाग:
प्रथम वर्ष: दिक्षित विनायक (९३.५३%), द्वितीय वर्ष: हब्बु श्रिया (९१.९४%), तृतीय वर्ष: सुभेदार अमीना (९६.१२%)
स्थापत्य अभियांत्रिकी विभाग:
प्रथम वर्ष: अँथनी शार्लिन (८६.६३%), द्वितीय वर्ष: सालुंकें विनय (७९.६६%), तृतीय वर्ष: सिद्राल देवराज (८९.००%)
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन:
प्रथम वर्ष: पूनम केदारी (७९.७६%), द्वितीय वर्ष: कोकाटे ओंकार (८५.८८%), तृतीय वर्ष: सांगा अक्षता (९१.३१%)
विद्युत अभियांत्रिकी विभाग:
प्रथम वर्ष: इनामदार गौरी (८६.३५%), द्वितीय वर्ष: गायकवाड अजिंक्य व कोहिंकर ओजस्विता (प्रत्येकी ८१.८८%), तृतीय वर्ष: माशाळे राधा (९०.३३%)
यंत्र अभियांत्रिकी विभाग:
प्रथम वर्ष: खानापूरे पार्थ (८७.६७%),
द्वितीय वर्ष: हवगोल समर्थ (८७.८८%),
तृतीय वर्ष: हिरोळी योगेश (८८.००%)
संस्थेकडून कौतुकाचा वर्षाव
विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व आणि कौतुकास्पद यशाबद्दल एस. ई. एस. तंत्रनिकेतनचे सचिव ॲड. व्ही. व्ही. मराठे, व्हाइस चेअरमन सीए विजय जवळगीकर, तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व विभागांचे विभागप्रमुख (HODs), प्राध्यापक वर्ग, शैक्षणिक समन्वयक, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
Post Views: 8