सोलापूर – दिनांक 2 एप्रिल ते सहा एप्रिल 2026 रोजी सिन्नर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पुरुष व महिला निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाची निवड केली जाणार आहे.
या स्पर्धेत सोलापूर संघ सहभागी होत आहे सोलापूर जिल्हा कबड्डी पुरुष संघाच्या कर्णधार पदी अंजुमन क्रीडा मंडळाचा अष्टपैलू खेळाडू सद्दाम गारेची कर्णधार पदी निवड झाली आहे व त्याचप्रमाणे या सोलापूर जिल्हा संघामध्ये अंजुमन क्रीडा मंडळाचा उत्कृष्ट कोपरारक्षक मुशरफ गारे याचीही निवड झाली आहे.
या निवडीबद्दल अंजुमन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष युसुफ विजापुरे, पप्पू गारे, मार्गदर्शक रफिक गारे सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल दादा जाधव कार्यवाह मदन गायकवाड सहसचिव संतोष जाधव, उमर विजापुरे, महबूब विजापूर, बशीर बेलाळकर समीर विजापुरे, रफिक विजापुरे यांनी अभिनंदन केले

















