सोलापूर – दोस्ती क्लब हसनापूर यांच्या वतीने 44 वा खुल्या राष्ट्रीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजन आंध्रप्रदेश गुंटूर येथे बापटला एप्पल ग्राउंड मध्ये करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्र , तेलंगना , तामिळनाडू, दिल्ली इत्यादी राज्यातून संघाने भाग घेतला होता.
महाराष्ट्र राज्य संघात एम. ए. पानगल अंगलो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी निकहत हसन बागवान ची निवड महाराष्ट्र राज्य संघात झाली होती. आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत महाराष्ट्र संघाने प्रथमतः तेलंगाना संघास 2-0 ने हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला व अंतिम सामना तामिळनाडू बरोबर 2-0 जिंकून महाराष्ट्र संघाने यश संपादन केले व सुवर्ण पदक प्राप्त केले.
पानगल कनिष्ठ महाविद्यालया ची निकहत बागवान ने राष्ट्रीय शूटिंग वॉलीबॉल स्पर्धेत स्वर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डॉ. हारून रशीद बागबान, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा शिक्षक नावेद मुन्शी, इक्बाल दलाल,अल्ताफ सिद्दिकी व तसेच सोलापूर शूटिंग बॉल असोसिएशनचे फौज अहमद बेगमपुरे, बागवान जमियत चे सर्व मित्र परिवाराने सदर खेळाडूचे अभिनंदन केले.
Post Views: 22