सोलापूर – शालेय शहर वुशु स्पर्धेत संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंनी सुवर्ण व एका खेळाडूने रौप्य पदक प्राप्त केले. या कामगिरीवर त्यांची जामखेड येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते , प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, सचिव ज्योती काडादी , शैक्षणिक सल्लागार प्रमोद दर्गोपाटील, प्र. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
——
कामगिरी : सुवर्ण : मुले : नैतिक ज्ञानेश्वर खुर्द (56 किलो) , वैभव बसवेश्वर कोळी (65 किलो), अजय बाबू महाजन (60 किलो), मुली : रिया जाधव (56 किलो), सफिना शेख (48 किलो). रौप्य: शर्वरी गुरव (45 किलो) .
——
Post Views: 26