माढा : रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय मार्गदर्शिका तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढा येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माढा येथील जगदाळे हॉल येथे १०० गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वह्या, पेन आणि शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्राम ओहोळ, ज्येष्ठ नेते यू. एफ. जानराव, अॅड. आकाश कापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे छायाचित्रकार महेश लंकेश्वर, रणजित देवकुळे आणि सुशांत गायकवाड यांनी केले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.