सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत आयोजित अंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत संगमेश्वर रात्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. रोशनी चव्हाण हिने गोळा फेक प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदक (सिल्वर मेडल) मिळवले. तिने ८ मीटर गोळा फेकून हे घवघवीत यश संपादन केले.
ही स्पर्धा दि. २३ ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान के. बी. पी. महाविद्यालय, पंढरपूर येथे पार पडली. रोशनीच्या या यशामागे महाविद्यालयाचे क्रीडा प्राध्यापक डॉ. शरण वांगी, जिमखाना विभाग चेअरमन डॉ. आनंद चव्हाण, प्रा. विक्रांत विभुते आणि प्रा. संतोष खेंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
रोशनीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. धर्मराज काडादी, सचिव श्रीमती ज्योती काडादी, तसेच रात्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोनाली गिरी, डॉ. एस. डी. गोठे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे विशेष अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Views: 113