बार्शी – पंचायत समिती शिक्षण विभाग, बार्शी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवगंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थी विविध स्पर्धा २०२६ अंतर्गत झालेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत जि. प. प्राथमिक शाळा क्र. २, उपळाई ठोंगे येथील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या कु. सानिका बालाजी ठोंगे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावत शाळेचे नाव उंचावले आहे.
शहरी भागातील विद्यार्थी असताना देखील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनीने हे यश मिळवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. सानिकाने “जलसंवर्धन” या विषयावर आधारित अतिशय अर्थपूर्ण चित्र रेखाटले होते “SAVE WATER, SAVE LIFE” हा संदेश प्रभावीपणे मांडला होता.
सानिकाला वर्गशिक्षिका श्रीमती दिपाली भास्कर गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेमुळेच सानिकाने हा बहुमान मिळवला आहे. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल काळे आणि सर्व शिक्षकवृंद, तसेच शाळा व्यवस्थापन समितीने सानिका आणि गोरे मॅडम यांचे अभिनंदन केले.
Post Views: 9