सोलापूर : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी आज सायंकाळी महापालिका प्रशासकीय इमारतीतील अभिलेखापाल कार्यालयाची पाहणी केली. राहिलेले 20 टक्के कागदपत्र स्कॅनिंग करून घ्यावेत. अनावश्यक कागदपत्रे नष्ट करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या.
सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी आज सायंकाळी पाचच्या सुमारास अभिलेखापाल कार्यालयाची पाहणी केली. पूर्ण व अपूर्ण कामांची माहिती घेतली. ठेवलेले रजिस्टर पाहिले. या कार्यालया अंतर्गत देण्यात येत असलेल्या नागरिकांसाठीच्या सेवा तातडीने सुलभपणे उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या.
या अभिलेखापाल कार्यालयात असलेल्या जन्म-मृत्यू रजिस्टर व इतर कागदपत्रे स्कॅनिंगची सुमारे 80 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित 20 टक्के स्कॅनिंगचे काम करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. या कार्यालयातील सूचनाफलक मजकुरात दुरुस्ती करून योग्य स्वरूपात करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी शेजारीच असलेल्या रूमची पाहणी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनावश्यक असलेली कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेली दिसून आली. तातडीने ही अनावश्यक कागदपत्रे नष्टीकरण करण्याचे सूचित केले.
यावेळी अभिलेखापाल कार्यालयातील लिपिक संजय सावळगी, कविता गाडेकर, नंदा कुमार , राजू बाभळे आदी कर्मचारी उपस्थित होते.

























