Saturday, June 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक  – आयुक्त डॉ. सचिन ओंबासे

तरुण भारतbyतरुण भारत
February 27, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – ‘अभ्यासातील कॉन्सेप्टस पूर्णपणे समजून घेऊन त्यांचे कोणत्याही भाषेत प्रभावी सादरीकरण करता आले पाहिजे. यासाठी सर्वप्रथम प्रत्येक गोष्ट मनापासून समजून घेतली पाहिजे. यासाठी इंटरनेटचा योग्य वापर केला पाहिजे. अभ्यास करताना प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे तरच प्रश्नाचे उत्तर सापडते कारण सध्या स्पर्धा परीक्षा हे विद्यार्थ्यांसाठी आव्हान बनले आहे. स्वेरीतील विद्यार्थ्यांमधून शिस्त दिसून आली आणि हीच स्वयंशिस्त भविष्यात व स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी खूप उपयोगी पडते.’ असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त (आयएएस) डॉ. सचिन ओंबासे यांनी केले.


स्वेरीमध्ये ‘डीकोडिंग द ड्रीम्स: पाथ वे टू पब्लिक सर्विस अपॉर्च्युनीटीज्’ या विषयावर आयोजिलेल्या प्रेरणादायी मार्गदर्शन सत्रात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त (आयएएस) डॉ. सचिन ओंबासे हे स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.


स्वेरीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे म्हणाले की, ‘करिअर करताना आपल्याला योग्य दिशा मिळावी यासाठी स्वेरीमध्ये ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा’ची स्थापना केली असून या केंद्राच्या माध्यमातून आज आयुक्त डॉ. ओंबासे सरांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल.’ असे सांगून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.


स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून ‘संस्थापक डॉ.बी.पी. रोंगे आणि ‘स्वेरी शिक्षण संस्था’ यांच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे, विद्यार्थ्यांच्या यशासाठी स्वेरीमध्ये होत असलेले प्रयत्न, संशोधन विभागातील प्रकल्प व मिळालेले निधी, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आयएएस व अशा प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी, शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मध्ये विद्यार्थी आघाडीवर असतात अशा विविध बाबींवर प्रकाश टाकला.


मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ. ओंबासे म्हणाले की, ‘सीईटी परीक्षा उत्तीर्ण करून आल्यानंतर स्वेरीमध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या ठिकाणी येतात. यासाठी स्वेरीचे प्रथम आभार. स्वेरीही  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखविण्याचे अविरत कार्य करत आहे, हे खरोखर कौतुकास्पद आहे. शिक्षण पद्धतीत अलीकडचे विद्यार्थी हुशार आहेत. माझ्या घरी देखील शैक्षणिक वातावरण असल्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी पोषक वातावरण मला मिळाले. त्यामुळे मी प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांक मिळवत होतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देखील अवघड गेली नाही. आता मात्र यूपीएससीचे नियम बदलले असून आज यूपीएससी आणि एमपीएससी अशा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या हेतूने अभ्यासक्रम समान ठेवला आहे. यासाठी पदवी व त्यानंतरचा अभ्यासक्रम या परीक्षेसाठी असतो. अभियांत्रिकी, फार्मसी व वैद्यकीय अभ्यास यामध्ये असतो.

अभ्यासक्रमात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, सामान्य शास्त्र हे प्रीलियम परीक्षेत विषय अभ्यासक्रम असतात. तरीही अवघड समजल्या जाणाऱ्या या स्पर्धा परीक्षेसाठी भारतातून पाच ते १० लाख विद्यार्थी परीक्षा देतात. त्यातून पाच ते दहा हजार जण उत्तीर्ण होतात. यासाठी सातत्याने परिश्रम करणे आवश्यक आहे.
यावेळी ज्ञानदीप अॅकॅडमीचे अॅड. महेश शिंदे यांनी देखील मार्गदर्शन केले.  यावेळी श्रीकांत जाधव, शिंदे, विनोद आसबे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, डिप्लोमाच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी वैष्णवी नवले, संस्थेअंतर्गत असलेल्या पाचही महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. ज्ञानेश्वर मिटकरी, सोनाली कांबळे आणि डॉ.नीता तळवलकर यांनी सूत्रसंचालन केले तर इंजिनिअरिंगच्या स्टुडंट कौन्सिलच्या सचिवा नेहा झिरपे यांनी आभार मानले.
————————-

वीस ते तेवीस हे वय वर्षे ऊर्जा देणारे
स्पर्धा परीक्षा देताना नियोजनात्मक अभ्यासासाठी वेळ द्यावा लागतो. इंजिनिअरिंग झाल्यावर प्रथम जॉब करावा त्यानंतर दोन तीन वर्षांनी स्पर्धा परीक्षा द्यावी. अनुभव न घेता जर परीक्षेला सामोरे गेले तर काही समजणार नाही. यासाठी प्रथम स्पर्धा परीक्षेची कन्सेप्ट पूर्णपणे समजून घ्या. कारण २० ते २३ हे वय वर्षे ऊर्जा देणारे आहे. त्यामुळे करिअर करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कोणीतरी सांगतय म्हणून स्पर्धा परीक्षा देवू नका. या स्पर्धेच्या युगामध्ये सेल्फ मोटिवेशन अत्यंत आवश्यक आहे असेही आयुक्त डॉ.ओंबासे  यांनी सांगितले.

Post Views: 36
Previous Post

रमजान महिन्यात व्यवसायाला रात्री १ वाजेपर्यंत परवानगी द्यावी

Next Post

शहरातील बचत गटातील महिलांसाठी ओला व सुका कचरा व्यवस्थापना बाबत जनजागृती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शहरातील बचत गटातील महिलांसाठी ओला व सुका कचरा व्यवस्थापना बाबत जनजागृती

ताज्या बातम्या

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

June 5, 2026
शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

June 5, 2026
एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

June 5, 2026

शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल पदांच्या १००% भरतीसाठी ८ जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

June 5, 2026
‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

June 5, 2026
मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

June 5, 2026
स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

June 5, 2026

 ‘एन.जी. रेड’ आणि ‘साऊथ सोलापूर ब्ल्यू’ संघांचे शानदार विजय

June 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0895661

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697