Monday, June 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शरद पवारांना मिळाली तुतारी, बघू गावागावात किती ऐकणार म्हातारी, शायराना अंदाजात आठवलेंची टीका

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 25, 2024
in solapur
0
शरद पवारांना मिळाली तुतारी, बघू गावागावात किती ऐकणार म्हातारी, शायराना अंदाजात आठवलेंची टीका
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रामदास आठवलेंनी आरपीआयचे दोन उमेदवार घोषित केले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले आणि सोलापुरातून राजा सरवदे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आरपीआयची भूमिका स्पष्ट केली आहे. रामदास आठवले यांनी रविवारी दुपारी बारा वाजता सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत माहिती देत सोलापूर लोकसभा मतदारसंघात आरपीआय तर्फे राजा सरवदे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी असणार, अशी माहिती दिली आहे.

 

आरपीआयच्या उमेदवाराला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास सोलापुरातील दलित मतांच विभागणीकरणं होणार आहे हे मात्र नक्की. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना प्रकाश आंबेडकर यांनी तगडी फाईट देत भाजपच्या उमेदवाराला अप्रत्यक्षपणे फायदा करून दिला होता. रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा मतदारसंघात आरपीआयच्या उमेदवाराला उभं केल्यास काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना जबरदस्त फटका बसणार आहे, असा अंदाज राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.

 

रामदास आठवले यांनी सांगितले की, शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात आरपीआय आठवले पक्ष स्वतःच्या चिन्हावर लढणार आहे. कमळाच्या चिन्हावर लढण्याचं प्रश्नच उद्भवत नाही. रामदास आठवले हे तीन वेळा खासदार आहेत. पंढरपूर मतदारसंघातून अपक्ष लढवले होते. त्यानंतर दोन वेळा खासदार झाले. तिन्ही वेळा स्वतंत्र लढलो, तर याही वेळेस स्वतंत्र लढणार असे रामदास आठवले यांनी चिन्हाबाबत स्पष्ट केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आरपीआय आठवले गटाचा उमेदवाराने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर काँग्रेस, भाजप आणि आरपीआय आठवले गट अशी लढत होईल.

 

दरम्यान रामदास आठवले यांनी आपल्या शेरोशायरी अंदाजातून तुतारीवर टीका केली आहे. “शरद पवारांना मिळाली आहे तुतारी… बघू या गावा गावात किती ऐकणार म्हातारी!”. रामदास आठवले यांनी शायराना अंदाजात तुतारीवर टीका करताच हास्यकल्लोळ निर्माण झाला होता. शरद पवार एनडीएसोबत आले असते तर त्यांचा पक्ष फुटला नसता. उद्धव ठाकरे देखील भाजपसोबत गेले असते तर त्यांचा पक्ष फुटला नसता, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंवर बोलताना रामदास आठवले यांनी गौप्यस्फोट केला आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र असताना उद्धव ठाकरेंनी मला उपमुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली होती. तसेच केंद्रातील अनंत गीते यांचा अवजड उद्योग मंत्रालय देण्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. पण मी स्पष्टपणे नकार दिला होता, अशी माहिती रामदास आठवले यांनी सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायलाच नको होतं. त्यांच्यामुळेच पक्ष फुटला, असाही आरोप केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी केला आहे.

Post Views: 68
Previous Post

मनोज जरांगे सागर बंगल्यावर येणार, मग आम्ही गप्प बसणार काय? आम्ही पण मराठे, नितेश राणे यांनी ललकारलं

Next Post

लोकांना आणखी फसवू शकत नसल्याने जरांगेंचे फडणवीसांवर आरोप – आनंद दवे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
लोकांना आणखी फसवू शकत नसल्याने जरांगेंचे फडणवीसांवर आरोप – आनंद दवे

लोकांना आणखी फसवू शकत नसल्याने जरांगेंचे फडणवीसांवर आरोप - आनंद दवे

ताज्या बातम्या

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

June 15, 2026

सांगोला पोलिसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

June 14, 2026

गोंदवले मसवड देवदर्शन करून येणाऱ्या पंढरपूरच्या भाविकांच्या पिकप ला अपघात पिकप विहिरीत पडून ८ जणांचा मृत्यू ७ जण जखमी  !

June 14, 2026

छोटा हत्ती विहीरीत पडुन  आठ जणांचा दुर्दैवी मृत्यु

June 14, 2026
प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

June 14, 2026
योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

June 14, 2026
लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

June 14, 2026
श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

June 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0910665

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697