
बार्शी – येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा “शिवस्वराज्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. यावेळी ग्रंथालयाचे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रभाऊ नलवडे, बप्पा सुतार, सतीश पाचकुडवे, इसाक मुकेरी, बापूसाहेब कुलकर्णी, आयुबभाई मुकेरी, ग्रंथपाल विनोद गायकवाड, कु.आर्या लोंढे यांचेसह सभासद, वाचक आदी उपस्थित होते.






















