सोलापूर – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्री हनुमान सार्वजनिक वाचनालय, वासुद (ता.सांगोला) येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस किशोर बनसोडे, वाचनालयाचे व जय हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब केदार-सावंत, दलित मित्र साबळे गुरूजी यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मनोगतातून किशोर बनसोडे यांनी प्रार्थना म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. तात्यासाहेब केदार-सावंत यांनी शिका संघटित होऊन कार्य सिद्धीस न्यावे. सर्वानीच एकत्र येऊन समाजातील जागर करावा. त्याकरिता आवश्यक ती मदत करेन असे आश्वस्त केले. या कार्यक्रमास शिवदास चंदनशिवे, दादासाहेब ऐवळे, सदानंद सावंत, अरूण ऐवळे, यश ऐवळे, भास्कर ऐवळे, कुंदन ऐवळे, उदय ऐवळे, रोहन चंदनशिवे, सौरभ चंदनशिवे, समाधान भोसले, आदित्य सावंत, साहिल ऐवळे, भिमराव ऐवळे, नवनाथ ऐवळे, संतोष सावंत, मायाप्पा ऐवळे, आशिष ऐवळे, अक्षय चंदनशिवे, राहुल ऐवळे, अशोक ऐवळे, संतोष ऐवळे, सचिन ऐवळे, दयानंद चंदनशिवे, मृणाल सावंत, कुमार ऐवळे, अतुल चंदनशिवे, आकाश सातपुते, क्रांती सातपुते, मोहन ऐवळे, दगडू ऐवळे, मुकेश ऐवळे, सागर ऐवळे, शैलेश ऐवळे, स्वप्नील ऐवळे, समाधान ऐवळे, शहाजी लांडगे, हनुमान विद्यालय व ग्रंथालय येथील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. ग्रंथालय कर्मचारी संतोष मोरे यांनी आभार मानले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















