Tuesday, June 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

तरुण भारतbyतरुण भारत
April 15, 2026
in editor
0
कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात समारंभ समिती व प्राध्यापक प्रबोधिनी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून झाली. यावेळी अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बलवंत, उपप्राचार्य डॉ.राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. समाधान माने, उपप्राचार्य डॉ.सुशीलकुमार शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे, समारंभ समितीचे प्रमुख डॉ. दत्तात्रय डांगे, प्राध्यापक प्रबोधिनी समितीचे प्रमुख डॉ. उमेश साळुंखे, कार्यालयीन प्रमुख चौरंगनाथ वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील लोकशाही मूल्ये” या विषयावर डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी सांगितले की, आंबेडकरांनी सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांना सर्वोच्च महत्त्व दिले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. तसेच आंबेडकरांनी राज्य हे मानवकेंद्रित असावे, ते न्याय व कल्याणासाठी वापरले जावे, असा मूलभूत विचार मांडला.


डॉ. शिंदे यांनी पुढे स्पष्ट केले की, काळाराम मंदिर सत्याग्रह व चवदार तळे सत्याग्रह या आंदोलनांतून सामाजिक समतेचा लढा अधिक बळकट झाला. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्त्वांची प्रभावी मांडणी केली. स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांनी हिंदू कोड बिलाद्वारे महत्त्वपूर्ण प्रयत्न केले.


अध्यक्षीय मनोगतात डॉ. बाळासाहेब बलवंत यांनी आंबेडकरांच्या विचारांची आजच्या पिढीसाठी असलेली गरज अधोरेखित केली. पश्चिम महाराष्ट्राला महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची समृद्ध विचारपरंपरा लाभली असल्याचे त्यांनी नमूद केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. उमेश साळुंखे यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 51
Previous Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्री हनुमान सार्वजनिक वाचनालय येथे मोठ्या उत्साहात साजरी

Next Post

पंढरीत गुलाबी रिक्षा चालक महिलेच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पंढरीत गुलाबी रिक्षा चालक महिलेच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

पंढरीत गुलाबी रिक्षा चालक महिलेच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

ताज्या बातम्या

पालकमंत्री गोरे, मोहिते -पाटलात वादाचे आलेख चढते #viral #maharashtranews

June 9, 2026

तुकाराम मुंढे म्हणाले राज्यातून दुधाची भेसळ हद्दपार करूया #marathinews #maharashtranews

June 9, 2026

तपपूर्तीचे केंद्रबिंदू गरिबांचे कल्याण मोदी #viral#news

June 9, 2026

*सावधान विचलित करणारी दृषे*अंगावर काटा आणणारे फिलिपाईन्समधील भूकंपाचे थरारक चित्र #viral

June 9, 2026
ऋषिकेश नलावडेचा ‘डोमीनाटर्स’ संघ विजेता 

ऋषिकेश नलावडेचा ‘डोमीनाटर्स’ संघ विजेता 

June 9, 2026
शिवाजी नाईट कॉलेजच्या तिघांची राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड 

शिवाजी नाईट कॉलेजच्या तिघांची राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड 

June 9, 2026
डब्ल्यूआयटीच्या पेटंटमुळे स्मार्ट कृषीच्या विकासाला नवी गती

डब्ल्यूआयटीच्या पेटंटमुळे स्मार्ट कृषीच्या विकासाला नवी गती

June 9, 2026
आंतरराष्ट्रीय शुडोकान कराटे परीक्षेत ११ प्रशिक्षकांना ‘ब्लॅक बेल्ट’ पदवी

आंतरराष्ट्रीय शुडोकान कराटे परीक्षेत ११ प्रशिक्षकांना ‘ब्लॅक बेल्ट’ पदवी

June 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0900745

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697