पंढरपूर – शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक श्रद्धेय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी युवानेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना परिचारक यांनी सांगितले की, “एक देश मे दो प्रधान, दो विधान, दो निशान नही चलेंगे” ही त्यांची भूमिका राष्ट्रीय एकात्मतेच्या विचाराला नवी दिशा देणारी ठरली. त्यांच्या विचारांचा वारसा देशाला अधिक समृद्ध आणि एकसंध भारत घडविण्याची प्रेरणा देत राहील असे सांगितले.
दरम्यान डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून युवक नेते प्रणव परिचारक तसेच भाजपा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा नगरसेवक सौरभ थिटे, सिकंदर ढवळे, आबासाहेब झेंड, नगरसेवक गणेश शिंदेनाईक, माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, भाजपा पदाधिकारी बालाजी वाघमारे, मिलिंद येळे यल्लाप्पा कबाडे, मयूर भिंगे, शीलरत्न झेंडे, युवराज मुचलंबे, कृष्णा कवडे, विशाल तूपसुंदर, भाजपा महिला पदाधिकारी अपर्णा तारके, सुवर्णा कुर्नावळ, सुचिता सगर आदींसह महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या.
Post Views: 18