Monday, July 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गोव्यात झालेल्या ग्लोबल कप राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूलचे दिमाखदार यश

तरुण भारतbyतरुण भारत
May 14, 2026
in editor
0
गोव्यात झालेल्या ग्लोबल कप राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूलचे दिमाखदार यश
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : गोवा राज्यातील मडगाव येथे दि. ६ ते १० मे २०२६ दरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या “ग्लोबल कप नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप” स्पर्धेत केगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विविध गटांतील संघांनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला. 

देशभरातील नामांकित संघांच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. अशा उच्चस्तरीय स्पर्धेत सिंहगडच्या खेळाडूंनी जिद्द, शिस्त आणि सांघिक खेळाच्या जोरावर दिमाखदार यश संपादन केले. अंडर-१२ मुलींच्या गटात सिंहगड पब्लिक स्कूलच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत मनोविकास गोवा संघाचा ७-४ अशा गोल फरकाने पराभव करत शानदार विजय मिळविला. या सामन्यात सिंहगडच्या खेळाडूंनी आक्रमक तसेच बचावात्मक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. कु. शरयू वल्लभ वसेकर हिने प्रभावी खेळ करत “प्लेअर ऑफ द मॅच” पुरस्कार पटकाविला.

त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सिंहगड पब्लिक स्कूल संघाने विबग्योर खारघर संघावर ६-२ असा एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. या सामन्यात कु. जानवी दिनेश बुराडे हिने उल्लेखनीय कामगिरी करत “प्लेअर ऑफ द मॅच” पुरस्काराचा मान मिळविला.

अंडर-१७ मुलांच्या गटात सिंहगड पब्लिक स्कूलच्या संघाने उत्कृष्ट फिटनेस, सांघिक समन्वय आणि जिद्दीच्या जोरावर संयुक्त तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच अंडर-१७ मुलींच्या गटातही संघाने प्रभावी खेळाचे प्रदर्शन करत संयुक्त तृतीय क्रमांक मिळवून संस्थेचा गौरव वाढविला.

या स्पर्धेसाठी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक राजू ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक महेश गोगी यांनी उत्कृष्ट नियोजन केले, तर खेळाडूंच्या फिटनेससाठी फिजिओ मंजुषा सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आणि ऊर्जा कायम राहिली.

सिंहगड पब्लिक स्कूलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव व सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव-सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, फिजिओ तसेच पालकांचे अभिनंदन केले. “खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते. राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण सिंहगड शिक्षण संस्थेसाठी अभिमानास्पद आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या यशामुळे सोलापूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून खेळाडू व सिंहगड शिक्षण संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post Views: 214
Previous Post

डब्ल्यू.आय.टी. चे अभिनव संशोधन पेटंट; ऊर्जा बचतीच्या दिशेने ठोस पाऊल

Next Post

बचत गटाच्या माध्यमातून पंढरपूरच्या रणरागिणीची गरुडझेप; एकाच वेळी सांभाळतेय चार उद्योग!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बचत गटाच्या माध्यमातून पंढरपूरच्या रणरागिणीची गरुडझेप; एकाच वेळी सांभाळतेय चार उद्योग!

बचत गटाच्या माध्यमातून पंढरपूरच्या रणरागिणीची गरुडझेप; एकाच वेळी सांभाळतेय चार उद्योग!

ताज्या बातम्या

सायकलच्या धक्क्यावरून वाद; उजनीत मध्यस्थी करणाऱ्या चुलत्याचा दगड मारून खून

July 5, 2026
खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

July 5, 2026
विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

July 5, 2026

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

July 5, 2026

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळविली – अहमद नगरच्या तरुणावर सोलापुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल

July 5, 2026
पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

July 5, 2026

ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते.. ओंकारेश्वर उटगे

July 5, 2026
मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

July 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0960298

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!