
सोलापूर – लिटिल चॅम्प बारा वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत फैज कादरी व रामभाऊ देगावंकर संघाने शानदार विजय मिळविले.
जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात फैज कादरी संघाने डॉ. देशपांडे संघाचा ५ गडी राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना डॉ. देशपांडे संघाने २५ षटकांत ७ बाद ९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात फैज कादरी संघाने २२.१ षटकांत ५ गडी गमावत ९८ धावा करून विजय मिळवला. साहिल रजानी याच्या अष्टपैलू योगदानाबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
दुसऱ्या रोमहर्षक लढतीत रामभाऊ देगावंकर संघाने अंबादास पवार संघावर २ गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना अंबादास पवार संघाने २१.२ षटकांत ९ बाद १०२ धावा केल्या. प्रत्युत्तरात रामभाऊ देगावंकर संघाने २०.१ षटकांत ८ गडी गमावत १०६ धावा करून विजय मिळवला. रामभाऊ देगावंकर संघाच्या अवनीश गारड याने ३ षटकांत ११ धावा देऊन ५ बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
या दोन्ही सामन्यासाठी पंच म्हणून चंदू मंजेली व अशोक डोंबाळे तर गुणलेखक म्हणून शुभम मुत्तूर यांनी काम पहिले.






















