अक्ककलकोट – पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत बोरोटी खुर्द येथील कन्नड शाळेच्या आवारात लोकसहभागातून आणि गावातील युवकांच्या सक्रिय सहभागाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिक्षणप्रेमी केतन वसंत राठोड यांच्या सहकार्याने व मल्लिकार्जुन वाडी यांच्या मदतीने विविध प्रकारची वृक्षरोपे उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमात गावातील युवकांनी स्वतः खड्डे खोदून वृक्षारोपण करत पर्यावरण संरक्षणाची सामाजिक जबाबदारी जपली. विशेष म्हणजे, केतन वसंत राठोड यांनी आपल्या गावाप्रती असलेले प्रेम जपत झापू तांडा रस्त्यावरही वृक्षारोपण करून ट्रीगार्ड बसविण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या कार्यामुळे झापू तांडा व बोरोटी परिसरातील नागरिकांकडून राठोड परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बोरोटी खुर्द कन्नड शाळेला वृक्षरोपे उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करणारे मल्लिकार्जुन वाडी, प्रभाकर सनगुंदी, सचिन कोळी, अजित पाटील, शरण चनगे, गुरु पाटील, चंद्रकांत पाटील, युवराज पाटील, आकाश मजगे तसेच सर्व युवकांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
शाळेतील शिक्षक शरणप्पा फुलारी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या प्रसंगी मुख्याध्यापिका राजश्री तांबे, सहकारी शिक्षक अनंत बांगर व अंजली वाघमारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धाराम बिराजदार, उपाध्यक्ष चिदानंद शिंगे, तसेच राजू हालोळ्ळी, गोपाल लोहार, काशिनाथ वाडी यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते
Post Views: 12