धाराशिव : स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, बालाजी नगर, शेकापूर येथील अंगणवाडी क्रमांक 624 येथे रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने यांनी बालकाला पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात केली. मोहिमेस पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी आशाताई सरिता नवनाथ गायकवाड, स्नेहलता शिवप्रसाद काजळे, अंगणवाडी सेविका शामल विद्यासागर विधाते, उपस्थित होत्या. तसेच आपल्या चिमुकल्यांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यासाठी आलेल्या पालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
याप्रसंगी शून्य ते पाच वयोगटातील बालकाना पोलिओचे डोस देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी आवर्जून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
Post Views: 18