वळसंग – दक्षिण सोलापूर येथील ग्रामदैवत श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रेस बुधवार दि.१३ मे पासून सुरुवात होत आहे. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
सालाबादप्रमाणे दि.१३ मे रोजी पहाटे पाच वाजता रुद्राभिषेक पूजेने सुरुवात होऊन रात्री आठ वाजता वामनायक मिरवणूक निघणार आहे. दि.१४ मे रोजी रात्री आठ वाजता नरसिंह मिरवणूक होईल. दि.१५ मे रोजी यात्रेतील मुख्य आकर्षक केंद्रबिंदू असलेल्या बाळबट्टल मिरवणूक मध्यरात्री १२.०० वाजता ढोल ताशाचा गजरात मिरवणूक निघून संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालत मंगळवार दि.१६ मे रोजी सकाळी सात वाजता श्री चौडेश्वरी मंदिर येथे परत पोहोचतील. त्याच दिवशी दुपारी १२.०० वाजता चौडेश्वरी देवीच्या मंदिरापासून ते हनुमान मंदिरापर्यंत कुंभ मिरवणूक, चौडेश्वरी मुकुट मिरवणूक होईल. रात्री आठ वाजता नागफणी (बाशिंग) व नंदीध्वज तसेच पालखीचे मिरवणूक निघणार आहे. दि.१७ मे रोजी सायंकाळी सात वाजता रथोत्सव व नागफणी, नंदीध्वज तसेच श्री चौडेश्वरी मातेची मुकुट मिरवणूक होईल. याच दिवशी रात्री करमणूक म्हणून माळी समाजाच्या वतीने कन्नड नाटकाचे आयोजन केले आहे.दि.१८ मे रोजी रात्री करमणूक म्हणून हटगार(कोष्टी) समाज कडून कन्नड नाटकाचे कार्यक्रम होईल.दि.१५ तारखेपासून १७ तारखेपर्यंत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २४ तास महाप्रसाद सेवा करण्यात येणार आहे.
या यात्रेला गेल्या 250 वर्षाची परंपरा असून यात्रेला भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी महाराष्ट्र,कर्नाटक तसेच इतर राज्यातील भाविक हजेरी लावतात. यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत या यात्रेच्या भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामलिंग चौडेश्वरी देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष श्री चनबसप्पा खैराटे व ट्रस्टीचे विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
चौकट :- वळसंग ग्रामदैवत चौडेश्वरी यात्रेसाठी वळसंग पोलीस शांती व सुव्यवस्था राखण्याची जिम्मेदारी घेतली आहे. यात्रेत कोणताही प्रकारची अनुचित कार्य होणार नाही याकडे पोलिसांची नजर राहतील तसेच पोलिसांकडून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याकडे सुद्धा लक्ष देण्यात येईल. पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे,यात्रा यशस्वीपणे सर्वांना दर्शन भेटेल असे आम्ही व्यवस्था करू…
सहाय्यक पोलीस निरीक्षक
राहुल डोंगरे

























