बार्शी – येथील बार्शी एज्युकेशन सोसायटी, बार्शी संचलित सुलाखे हायस्कूल, बार्शी चा इ. १० वी परीक्षेचा निकाल ९६ टक्के लागला. अभिनंदन चंद्रकांत नवले या विद्यार्थ्याने ९९.२० टक्के गुण संपादन करुन प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर प्रिती राजकुमार टोणगे हिनी ९७.८० टक्के गुण संपादन करुन द्वितीय क्रमांक तर प्रज्ञा संतोष तोडकरी या विद्यार्थीनीने ९७.४० टक्के गुण संपादन करुन प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला.
इ. १० वी परीक्षेसाठी सुलाखे हायस्कूल, बार्शी या प्रशालेतील एकूण ३५० विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते त्यापैकी ४७ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण संपादन करुन विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. प्रशालेतील १३९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ९१ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, ७३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये तर ३३ विद्यार्थी पास श्रेणीमध्ये उत्तीर्ण होवून सुलाखे प्रशालेने इ. १० वी परीक्षेच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली.
प्रशालेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे, मुख्याध्यापक रामकृष्ण इंगळे, उपमुख्याध्यापक, प्रसन्न देशपांडे, पर्यवेक्षिका सौ. उर्मिला जावळे व पर्यवेक्षक वैभव कदम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.























