पीसीपीएनडीटी (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques) कायद्यांतर्गत राज्य पर्यवेक्षीय मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आरोग्य भवन, आरोग्य सेवा आयुक्तालय येथे दि. 27 मे 2026 रोजी पार पडली.
सदर बैठकीमध्ये माननीय आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नोंदणीकृत खाजगी सोनोग्राफी सेंटरला अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी संबंधित सेंटरमधील रुग्ण नोंदी,ऑनलाईन एफ फॉर्म, कायद्याचे पालन, आवश्यक कागदपत्रे तसेच सोनोग्राफी सेंटर मधील विविध बाबींची तपासणी करण्यात आली.
पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, लिंग निवड प्रतिबंध आणि गर्भलिंग निदानास आळा घालण्याच्या उद्देशाने अशा भेटी व तपासण्या नियमितपणे घेण्यात येत असल्याचे डॉ. दिगंबर कानगुले- उपसंचालक (वि. ल.टो), राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर कायद्याचे उल्लंघन करत असल्यास किंवा अनाधिकृत पणे कोणी गर्भलिंग निदान करत असल्यास नागरिकांनी
www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर तसेच
हेल्पलाईन क्रमांक 1800-233-4475 व 104 वर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
सदर भेटीदरम्यान जिल्हास्तरीय अधिकारी व सोनोग्राफी सेंटर चे डॉक्टर उपस्थित होते.
Post Views: 10