सोलापूर- विद्यार्थ्यांनी आपले उच्च शिक्षणामध्ये उत्तम करिअर घडवावे, ज्यामुळे ते स्वतःची, समाजाची व देशाची प्रगती करू शकतात. तसेच सर्वच क्षेत्रात आपले प्रतिनिधीत्व करून प्रामाणिक आपली सेवा करावी करावे. समाजातील वंचिताचे दुःख दूर करून त्यांच्यासाठी योग्य दिशा दाखवावी. सध्या आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून एआयचा वापर विचार करण्याची क्षमता कमी करण्यासाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांनी आपली विचारशक्ती अधिक विकसित करण्यासाठी उपयोग करावे, असे जमाते इस्लामी हिंदचे शहर अध्यक्ष डॉ. इस्माईल शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सोलापूर शहर बागबान जमियततर्फे दहावी, बारावी व पदवी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ फडकुले हॉलमध्ये पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सोलापूर शहर बागबान जमियतचे अध्यक्ष डॉ. एम. ए. दलाल तर प्रमुख पाहुणे म्हणून जमाते इस्लामी हिंदचे शहर अध्यक्ष डॉ. इस्माईल शेख, लवाद समितीचे सदस्य हाजी मुख्तार हुमनाबादकर उपस्थित होते.
प्रारंभी जमियतचे अध्यक्ष डॉ. एम. ए. दलाल यांनी शिक्षणाचे महत्व स्पष्ट करून जमियतच्या कामाचा आढावा सादर केला. सहसचिव जनाब फय्याज बागबान यांनी स्वागत केले. बागवान शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. हारून रशीद बागबान यांनी प्रास्ताविकामध्ये जमियतमध्ये होत असलेल्या उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमात जमियतचे वकील, पदवीधर, दहावी, बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या सुमारे तीनशे विध्यार्थ्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव अखलाक मर्चंट, उपाध्यक्ष अल्ताफ लिंबूवाले, उपाध्यक्ष मुश्ताक सरदार, खजिनदार इम्तियाझ दलाल, सहसचिव फय्याज बागबान, संचालक मुश्ताक एम. राऊंड, अ. मतीन बागबान, एजाज बागबान, हाफिज अ. सलाम, हाफिज अ. रजाक चौधरी, मुश्ताक इंजिनिअर, ॲड. आमिर बागबान, इफ्तेकार तुळजापूरे यांनी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचालन अशफाक मेम्बर यांनी तर आभार अल्ताफ लिंबुवाले यांनी मानले.


















