नवीन नांदेड प्रतिनिधी
जीवनराव गणपतराव कदम धानोरा (कौठा)ता.कंधार येथील असून ते प्रथम जुन १९९१ मध्ये गणपतराव मोरे विद्यालय किवळा ता.लोहा येथुन सेवेला सुरुवात करून इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथुन दिनांक ३०जुन २०२४ रोजी ३३ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे आसल्याने दिनांक २९ जुन रोजी सेवापुर्ती कार्यक्रमाचे आयोजन गुरुकृपा मंगल कार्यालय हाडतोय येथे दुपारी २ वाजता करण्याचे आहे
-जीवनराव गणपतराव कदम हे धानोरा (कौठा)ता.कंधार असून प्राथमिक शिक्षण धानोरा येथे झाले तर हायस्कूलचे शिक्षण जनता हायस्कूल कौठा व महाविद्यालयीन शिक्षण प्रतिभानिकेतन महाविद्यालय नांदेड व यशवंत महाविद्यालय नांदेड येथे पुर्ण करुन शासकियअध्यापक महाविद्यालय नांदेड येथे बी. एड्.चे शिक्षण पुर्ण केले.त्या नंतर शासकीय सेवेत जुन १९९१ मध्ये गणपतराव मोरे विद्यालय किवळा ता.लोहा येथुन सेवेला सुरुवात करून पुढे संत मोतीराम हायस्कूल कारेगाव ता.लोहा, श्री शारदा भवन हायस्कूल नांदेड व शेवटच्या काळात इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथून प्रदिर्घ ३३ वर्षाच्या सेवेनंतर दिनांक ३० जुन २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत तेव्हा २९ जुन रोजी सेवापुर्ती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन गुरुकृपा मंगल कार्यालय हडको येथे दुपारी दोन वाजता करण्याचे योजले आहे.