पंढरपूर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सोलापूर येथील पार्क स्टेडियम येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत माईर्स विश्वशांती गुरुकुल हायर सेकंडरी स्कूल, वाखरी, पंढरपूर येथील १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
या संघामध्ये तनिष्क कोळी, ओम शिनगारे, श्रेयांश जाधव, शिवम जोडगे आणि तनिष्क देशमाने या विद्यार्थ्यांचा समावेश होता. सर्व खेळाडूंनी स्पर्धेत कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयाच्या हेडमिस्ट्रेस सौ. शिबानी बॅनर्जी, प्रिन्सिपल डॉ. श्री. स्वप्नील शेठ आणि क्रीडा शिक्षक श्री. प्रविण पिसाळ यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, विद्यालयासाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे कु. कीर्ती दशरथ वाघ हिची बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. तिच्या या निवडीबद्दलही विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, पुढील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे माईर्स विश्वशांती गुरुकुल हायर सेकंडरी स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Post Views: 15