पंढरपूर- व्हीटीबी (VTB) बॅडमिंटन अकॅडमी, सांगोला येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाखरी, पंढरपूर येथील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा क्रीडा अधिकारी दत्ता वरकड, रेफरी तुषार मुळे आणि क्रीडा शिक्षक प्रवीण पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. मुलींमधून एमआयटी ज्यू. कॉलेजच्या अपर्णा चव्हाण, श्रद्धा महाडिक, संजना बाड, अनुष्का चाकूर आणि आर्या कुलकर्णी या विद्यार्थ्यांची पुणे विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच मुलांच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत शुभंकर गारे, राजवीर बोरसुरे, विराज खरसडे, मल्हार नांदगावकर आणि दक्ष पटेल यांच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. शुभंकर गारे व पृथ्वीराज भाळवणकर यांची डिव्हिजन ट्रायलसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षकवृंद व क्रीडा विभागाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Post Views: 6