बार्शी – येथील बार्शी एज्युकेशन सोसायटी संचलित सुलाखे इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता १० वी (एसएससी) परीक्षा मार्च २०२६ चा निकाल १०० टक्के लागला आहे.
परीक्षेला बसलेले विद्यार्थी- ५०, उत्तीर्ण विद्यार्थी- ५०.विशेष प्राविण्य (Distinction)- १९, प्रथम श्रेणी (1st Class)- २२, द्वितीय श्रेणी (2nd Class)- ४, उत्तीर्ण श्रेणी (Pass Class)- ५. टक्केवारी – १०० टक्के.
९५% पेक्षा अधिक- १, ९०% पेक्षा अधिक- ३, ८५% पेक्षा अधिक- ३, ८०% पेक्षा अधिक- ७.
सुलाखे इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सर्व गौरवशाली यशस्वी विद्यार्थ्यांचे बार्शी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष श्री. आनंद सुलाखे, सचिव श्री. अनंत कवठाळे , शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुषार महाजन सर, संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांचा शाळेत यथोचित सत्कार केला आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.


























