बार्शी – येथील सुलाखे हायस्कूलचे उपक्रमशील क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी बार्शी तालुका क्रीडा सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. आजवर क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांनी शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी जागृती, विविध क्रीडा उपक्रमांचे प्रभावी आयोजन तसेच गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल सुलाखे हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडाप्रेमी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views: 12