अक्कलकोट – राजेंद्र अहिरराव अंबरनाथ व सहकाऱ्यानी सादर केलेली मन लागोरे लागोरे गुरु चरणी ‘तुझ्या पायरीशी आज चालुनी आलो स्वामी रंगी न्हाऊनिया स्वामीमय झालो ! अशी भक्ती गीतातून आर्त हाक घालीत अनेक अवीट गीते अभंग गोळण सादर केल्याने स्वामी भक्ताची रविवारची सांज अविस्मरणीय ठरली .
वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे समर्थांच्या १४८ पुण्यतिथी निमित्य आयोजित धर्म संकीर्तन महोत्सवात तिसरे पुष्प गुंकताना रविवारी भक्ती संगीत सेवेत अभंग गौळण भक्ती गीत स्वामी भक्त नाहुन निघाले
रसिक श्रोत्याच्या ओठावरील व भक्ती रंगाचा ठावा घेणारे ‘ मन लागोरे लागोरे गुरु चरणी , वेदानाही नाही कळला अंत पार कानडा राजा पंढरीचा , सर्व मांगल्य मांगल्ये , दिंगबरा दिंगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊनी दत्ताची पालखी ‘ , तुझ्या पायरीशी आज चालुनी आलो स्वामी रंगी न्हाऊनीया स्वामीमय झालो , अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक , हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची ‘ दत्त दिंगबर दैवत माझे ऋदयी माझ्या नित्य विराजे, अभिर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ‘ माझे माहेर पढिरी ‘ धाव पाव स्वामी समर्था
मला बघायची जेजुरी ‘ यमुनेच्या तिरी पाहिला हरी .. जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही ‘ स्वामी कृपा कधी करणार तव चरणाचे दर्शन आता अशी भाविकांच्या
ओठावरील अभंग भक्ती गीत गौळण सादर केले .
भक्ती संगीत कार्यर्यक्रमाचे आयोजक रविद्र भास्कर झोपे ‘ संयोजक राजेंद्र आहिरराव ‘ गायक निवेदक प्रणव थोरात अभिजित काटे , गायक मृणाल ठाकुर देसाई , तबला निवेदक निखिल फडके , ढोलकी गुरुप्रसाद कुंभार आदिनी भक्ती संगीता मध्ये स्वामीचरणी सेवा रुजु केली सर्व कलाकारांचा वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान चे चेअरमन माजी नगराध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते कृपावस्त्र प्रसाद देऊन यथोचित सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे , प्रथमेश इंगळे मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, अमर पाटील, संजय पाठक, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, सागर गोंडाळ, नागनाथ गुंजले, श्रीशैल गवंडी, संजय पवार, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले प्रसाद पाटील राजु भोसले बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर मनोज जाधव लोणारी अशोक कडगंची इत्यादी उपस्थित होते.
















