वळसंग – समग्र शिक्षा संघर्ष समिती च्या वतीने सेवेत कायम करणे बाबत गेल्या ०९ मार्च पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन चालू आहे आज आंदोलनाच ६५ वा दिवस आहे. या अंतर्गत ३३७८ कर्मचारी गेल्या २० ते २५ वर्षपासून तुटपुंजय मानधनावर काम करीत आहेत. शासन चा कोणताही लाभा या कर्मचाऱ्यांना मिळत नाही.
सेवा बाजावत असताना २५७ कर्मचारी मरण पावले आहेत त्याना कोणतंही लाभ शासनलकडून मिळत नसल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. सदर कर्मचारी यांचे जस्तीत जास्त ०८ ते १० वर्ष इतकीच सेवा असल्याने मायबाप सरकारकडून कायम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारी शाळेचा पट व गुणवत्ता वाढविण्यामध्ये यांचा मोठा वाटा असल्याचे बी.आर.सी चे विषय तज्ञ,गटशिक्षणाधिकारी सहाय्यक सिद्रामय्या स्वामी यांनी सांगितले लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली गेली.

























