जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज, गुरुवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात एक जिहादी दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील फ्रासीपोरा येथील मुरान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. येथे दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसरित शोध मोहिम हाती घेतली. यावेळी पहाटेच्या अंधारात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी दोन्ही बाजुंनी काही काळ परिसरात गोळीबार सुरूच होता. यात एक जिहादी दहशतवादी ठार झाला आहे. या चकमकीनंदर जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा जवानांनी घेराव घातला आहे. दरम्यान आठवड्याभरापूर्वीच उरी येथे एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.