
बार्शी – सोमवार दि. १ जून रोजी बार्शी आगारमध्ये एसटी बसचा ७८ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या वेळी बस स्थानकावरील एसटीची प्रतिकृती असलेल्या वाहतूक नियंत्रक कक्षाला व सर्व फलाटाला विद्युत रोषणाई करण्यात आली. एसटी महामंडळाचा लोगो रांगोळी स्वरुपात महिला कर्मचाऱ्यांनी यांच्यातर्फे वाहतूक नियंत्रक कक्षासमोर काढण्यात आली. त्याचबरोबर बार्शी- मुंबई जाणारी बस सजवण्यात आली. बसला हार, फुगे इ. वस्तू लावून सजविले होते. सदरच्या कार्यक्रमाला आगारातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांना माननीय आगार व्यवस्थापक यांच्यामार्फत आग्रहाचे निमंत्रण दिले असल्याने सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी हजर होते. त्यापैकी सेवानिवृत्त कर्मचारी श्री. रमेश शंकरराव देशमुख, माजी उपयंत्र अभियंता यांच्या हस्ते वर्धापनानिमित्त आणलेला केक कापून प्रवाशांना व उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना साखरपेढा वाटण्यात आला. सदर कार्यक्रमावेळी आगार व्यवस्थापक श्री. संजय हरिभाऊ भोसले, सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री. विजय तानाजी हांडे, श्री. गणेश लक्ष्मण चव्हाण, वाहतूक निरीक्षक, श्री. विजय दत्तात्रय बुटे, लेखाकर, श्री. रामराव मेंडके, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, श्री. भरत लक्ष्मण नलवडे सहाय्यक वाहतूक निरीक्षक, हे अधिकारी उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ लिपीक महेंद्र क्षीरसागर, वरिष्ठ लिपीक पुरुषोत्तम वाघुरकर, श्री. संदेश बापू थोरात लिपीक, श्री. बाबा नाईकवाडी व उपस्थित कार्यशाळा कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post Views: 8