Wednesday, July 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री चौडेश्वरी देवीची यात्रा उत्सवाची सांगता कड़ी जत्री कार्यक्रमाने झाली

तरुण भारतbyतरुण भारत
May 28, 2026
in solapur
0
श्री चौडेश्वरी देवीची यात्रा उत्सवाची सांगता कड़ी जत्री कार्यक्रमाने झाली
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट – महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र माशाळ येथील श्री चौडेश्वरी देवीची १५ दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता शनिवारी एक लाख भाविकांच्या उपस्थितीत कड़ी जत्री (शेवटची यात्रा) भव्य-दिव्य विविध कार्यक्रमाने झाली. विशेष म्हणजे घोड्याचा खेळ व पाखरं मारण्याचा खेळ अप्रतिम सादर केले असल्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शनिवारी तब्बल १२ तास चाललेल्या सवाद्य मिरवणुकीत कर्नाटकसह महाराष्ट्रामधील असंख्य भाविक भक्तिभावाने सहभागी झाले होते. या यात्रेत सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतले. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, अरुणकुमार पाटील, नितीन गुत्तेदार, वैजनाथ निंगदळी, राजकुमार पाटील, मंदिर समितीचे अध्यक्ष गुंडप्पा कुंभार, उपाध्यक्ष चंद्राम कुंभार, सिद्धप्पा कुंभार, नानासाहेब पाटील, सुरेश रँका, शिवण्णा पारगोंडा, श्यामराव प्रधानी, जी. एम. कोरबू, अभिषेक पाटील,  विश्वनाथ रेवूर, हणमंत बारामणी, शिवानंद प्याटी, धुळाप्पा राजा, मल्लिनाथ गडेद, शिवरुद्रप्पा अवटगी, खासिमसाब पिंजार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी या उत्सवाला पहाटे श्री च्या आरतीनंतर मंगलमय वातावरणाने सुरुवात झाली. कडी जत्रेच्या पहाटे पाच वाजल्यापासूनच श्रीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असल्यामुळे दिवसभर मोठी रांग लागली होती. देवस्थानाच्या गाभाऱ्यास विविध आकर्षक पुष्पमालेनी सुशोभित करण्यात आले होते. त्यानंतर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सप्तरंगांच्या फुलांनी सुशोभित करण्यात आलेल्या श्रींचे पूजन मुख्य पुजारी धुंडप्पा कुंभार, चंद्राम कुंभार परिवार व मान्यवरांच्या हस्ते करुन मार्गस्थ झाली. विशेषतः दिवसभरात सुमारे अकरा हजारहून अधिक भाविकांनी श्री देवीला सप्तरंगी बाशिंग अर्पण करुन दर्शन घेतले. मिरवणुकीसमोर अनेक मशाल दिवे, ढोल संघ, बंड पथक, हलगीचा निनाद, ताशांचा कडकडाट, टाळ व सनईच्या मधुर आवाजाने सारे वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी डिजिटल फटाक्यांसह दारु गोळ्यांची आतषबाजीसह टाळ्यांचा, शिट्यांचा वर्षाव व श्री च्या जयजयकाराने संपूर्ण माशाळ शहर व परिसर दुमदुमून गेले होते. परगावहून आलेल्या भाविकांसाठी मंदिर पंच कमिटी व दानशूर व्यक्तींनी श्री हनुमान मंदिर व मंगल कार्यालयात सराफ व्यापारी शिवकुमार डांगे, व पंच कमिटी यांच्यावतीने हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता मुख्य चौकात मिरवणूक आल्यानंतर अनेक मानकरी परिवाराच्यावतीने पारंपारिक पद्धतीने बाशिंग अर्पण करून ओटी भरण्यात आली. त्यानंतर शांतप्पा हडपद यांनी घोड्याचा खेळ सादर करून उपस्थितांना डोलायला तर हणमंत हगार यांनी पाखर मारण्याचा खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शेवटी मंदिरात रात्री महामंगलारतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी पंचरत्न आरती ओवाळण्यासाठी व नैवेद्य दाखविण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्याचे सूत्रसंचालन नागप्पा बारामनी यांनी केले. रविवारी सायंकाळी मल्लांच्या जंगी कुस्ती स्पर्धेने उत्सवाची सांगता झाली.
अफजलपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनिंग वडेर यांनी चोख बंदोबस्त ठेवले होते.
सर्वधर्मसमभाव दर्शन – श्रीक्षेत्र माशाळ येथील चौडेश्वरी देवीची यात्रा हा एक आगळा वेगळा उत्सव आहे. प्राचीन काळापासून गावातील मुस्लीम समाज बांधवासह प्रत्येक समाजासाठी देवीची विशेष सेवा करण्याचा मान आहे. अशी प्रथा इतर कोठेही पाहायला मिळत नाही. ज्या दिवशी देवी बीजाला स्पर्श करते, त्या दिवशी शेतकरी बिया घेऊन पेरणी करतात. आईच्या आशीर्वादाने चांगले पीक मिळेल. भाकणूक मुदकन्ना हुगार यांनी भाकणूक सांगताना यंदाच्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले. आणि भक्ती सोबतच ग्रामीण कलांचे अनावरण हे या जत्रेचे वैशिष्ट्य असल्याचे मत यात्रा समितीचे मुख्य समन्वयक श्यामराव प्रधानी यांनी संचार शी बोलताना सांगितले.
Post Views: 44
Previous Post

सोलापुरात वीज चोरी प्रकरण दडपल्याचा आरोप; कारवाईऐवजी नवीन कनेक्शन दिल्याने संशय

Next Post

इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने इंगळे यांचा मानपत्र देऊन सन्मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने इंगळे यांचा मानपत्र देऊन सन्मान

इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने इंगळे यांचा मानपत्र देऊन सन्मान

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

खुशखबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा……

July 21, 2026

‘एक विशेष बाब लिहून बी टू रद्दचा आदेश आला #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

*सावधान ही दृशे तुम्हाला विचलित करू शकतात* समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील तिघांसह सहाजण ठार

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0990502

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!